जिल्हयात ८ पैकी ६ पंसचे सभापती पद आरक्षीत, २ खुले
उस्मानाबाद/प्रतिनिधी-जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापतींचे आरक्षण शुक्रवारी (दि.13) सोडतीमध्ये जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये उस्मानाबादचे सभापतिपद अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, तुळजापूर सर्वसाधारण महिला प्रवर्गाला तर भूम व लोहाऱ्याचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच खुला महिला प्रवर्गाला कायम राहिले आहे.
शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोडत काढण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये उस्मानाबादचे सभापतिपद एससी महिला प्रवर्ग, उमरगा-ओबीसी, कळंब-ओबीसी महिला, तुळजापूर, भूम, लोहारा - सर्व सर्वसाधारण महिला प्रवर्ग परंडा-सर्वसाधारण प्रवर्ग व वाशी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले.