धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.सकाळी त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवींची विधीवत अभिषेक पूजा केली. अभिषेक पूजेनंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या होणाऱ्या नित्य आरतीमध्ये सहभागी होऊन देवीजींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
या प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी श्री तुळजाभवानी देवीसमोर राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वागत केले.यावेळी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.