ढोकी येथे विज्ञान प्रदर्शना मोठा प्रतिसाद ; २०० पेक्षा जास्त साहित्यांचे सादरीकरण 
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शालेय जीवनातच विद्याथ्र्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तालुका, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन का आयोजन केले जाते. उस्मानाबाद तालुक्याचे प्रदर्शन ढोकी येथे शुक्रवारी झाले. यावेळी सुमारे २०० पेक्षा जास्त विद्याथ्र्यांनी प्रयोगाचे सादरीकरण करून विद्याथ्र्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले असे प्रतिपादन उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती अर्चनाताई पाटील यांनी केले.
ढोकी येथे विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अर्चना पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी मजूर फेडरेशनचे अध्यक्ष गफार काझी, पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता भोसले, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, सदस्य बाजीराव पवार, संग्राम देशमुख, सरपंच नाना चव्हाण, उपसरपंच अमोल समुद्रे, गटशिक्षणाधिकारी पारवे, वाकुरे, दत्ता तिवारी, झुंबर बोडके, यांची प्रमुख उपस्थिती होती.
विज्ञान प्रदर्शनासाठी शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा मुख्य विषय होता. यावेळी प्राथमिक विभागातून १३३, माध्यमिक विभागाचे १६ व अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात प्राथमिक विभागाचे ४६, माध्यमिक विभागाचे ५ अशा २०० से वर प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी पारवे यांनी केले तर सूत्रसंचालन भावना चौधरी व शिवाजी चव्हाण यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी दैवशाला हाके यांनी मानले. प्रदर्शनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी किशोरी जोशी, केंद्र प्रुख जगदीश जाकते, प्रमोद अनपट , तेरण बीटमधील मुख्याध्यापक, शिक्षक, गट शिक्षण विभागातील अधिकारी व कर्म-यांनी परिश्रम घेतले.
 
Top