तुळजापूर / प्रतिनिधी
- येथील उस्मानाबाद तुळजापूर रस्त्यावर नगराध्यक्ष बापुसाहेब कणे यांच्या घरासमोरील असलेल्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट वर ट्रक जावुन आदळल्याने यात नगरपरिषद चे 65हजार रुपयाचे नुकसान झाले .
ही घटना बुधवार दि18रोजी पहाटे 12.30वा घडली.
या प्रकरणी ट्रक चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबतीत अधिक माहीतीअशीकि उस्मानाबाद तुळजापूर रस्त्यावर नगराध्यक्ष बापुसाहेब कणे यांच्या घरासमोर कणे बसस्टाँप रस्त्यावर असलेल्या नगरपरिषद  स्ट्रीटलाईट पोलवर उसाने भरलेला ट्रक क्रमांक MH12FZ3183 जावुन आदळल्याने यात सिमेंट पोल तुटुन पडून यात 65हजारचे नुकसान झाले या प्रकरणी नगरपरिषद विद्युत  पर्यवेक्षक संजय झाडपिडे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी ट्रक चालक विकास नरसिंग आळणे रा शिवली जि लातूर याचा विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
 
Top