तुळजापूर/ प्रतिनिधी- तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील माजी सरपंच यांनी अपत्याचे खोटे घोषणापञ दाखल केल्या प्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशीकि होर्टी ता तुळजापूर येथील ज्ञानेश्वर गोपाळ भोसले यांनी प्रभाग क्रमांक चार मधुन ग्रामपंचायत सदस्य निवडणूक लढवली नामनिर्दशन पञ सोबत अपत्याचे घोषणापञ  12  सप्टेंबर 2001 नंतर  तीन अपत्य नसल्याचे घोषणापञ देणे बंधनकारक असताना 12 सप्टेंबर 2001नंतर तीन अपत्य नसल्याचे घोषणा पञ देवुन निवडणूक लढवली.परंतु सदर ज्ञानेश्वर भोसले यांना तीन अपत्य आसल्या बाबातचे ञन्म प्रमाण पञाची नोंद  शालेय शिक्षण विभागातील रेकाँर्ड वरुन अँड एम बी माढेकर यांच्या युक्ती वादावरुन   सिध्द झाल्याने प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी तुळजापूर यांनी ज्ञानेश्वर भोसले विरुध्द फौजदारी संहिता कलम 156(3)अन्वय तुळजापूर पोलिस स्टेशन मध्ये  गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.फिर्यादी वतीने अंड एम बी माढेकर यांनी काम पाहिले.
 
Top