उस्मानाबाद /प्रतिनिधी-
दोन वर्षापूर्वी जनावरांच्या चा-यासाठी कडबाकुट्टीद्वारे कडबा कापत असताना एका शेतक-याचा हात सदरील यंत्रात अडकून त्यांना अपंगत्व आले होते. याप्रकरणी शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत भरपाईची मागणी केल्यानंतर कंपनीकडून ती नाकारण्यात आली होती. परंतु, शेतक-याने जिल्हा ग्राहक मंचाकडे दाद मागितल्यानंतर मंचने याप्रकरणी सदरील शेतक-यास व्याजासह एक लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत.
भूम तालुक्यातील डोकेवाडी येथील शेतकरी भास्कर अच्युतराव जालन हे दि.25 ऑगस्ट 2017 रोजी शेतात कडबाकुट्टीद्वारे कडबा कापत असताना अपघाताने त्यांचा डावा हात यंत्रात अडकून त्यांना 68 टक्के अपंगत्व आले होते. त्यांनी अपंगत्व आल्याने शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे तालुका कृषी अधिका-यामार्फत प्रस्ताव सादर केला होता. परंतु, सदरील प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केल्याने जालन यांनी अॅड. एस.एस. रितापुरे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली होती. यावेळी सादर केलेली कागदपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्र व अॅड. रितापुरे यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे ज्येष्ठ सदस्य मुकुंद सस्ते व शशांक क्षीरसागर यांच्या न्यायपीठाने शेतकरी अपघात विम्याचा दावा मंजूर करून 1 लाख रुपयांची रक्कम ही दि.8 जून 2018 पासून दसादशे 8 टक्के व्याजदराने देण्याचा आदेश दिला. तसेच भास्कर जालन यांना या तक्रारीपोटी झालेला मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रासापोटी 10 हजार रुपये देण्याचे आदेश दि.5 डिसेंबर रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.