उस्मानाबाद /प्रतिनिधी -
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील दहावीत शिकणा-या विद्याथ्र्याने घरच्या आर्थिक अडचणीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.6) मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5 वाजेदरम्यान घडली.
येडशी येथील लवटे वस्तीवर राहणारा जीवन लक्ष्मण नागटिळक (16) गावातील जनता विद्यालयात दहावीत शिकत होता. त्याने शिक्षणासाठी पैसे नसल्याने तसेच वडिलांच्या डोक्याचेही ऑपरेशन झाल्याने घरातील आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. घरासमोरील बाभळीच्या झाडाला त्याने गळफास घेतला. याप्रकरणी राम काशिनाथ लवटे यांच्या माहितीवरुन उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हेड कॉन्स्टेबल शेंडगे करत आहेत. 
 
Top