तुळजापूर/प्रतिनिधी-
पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी 01 सुवर्ण, 04 रौप्य पदकासह  तब्बल 09 पदकावर नाव कोरले. यशस्वी खेळाडूंचे कौतुक होत आहे.
 इंद्रायणी इंन्टरनॅशनल स्कूल आंबेगाव पुणे येथे आयोजित  " खेलो कराटे " या  06 व्या राज्यस्तरीय खुल्या कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत तुळजापूरच्या खेळाडूंनी यश  मिळवले आहे.  या स्पर्धेत  कोल्हापूर,  सोलापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून तब्बल 450 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत शहरातील न्यु कराटे डो असोसिएशन चे एकूण 11 खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी 09 खेळाडूंनी पदक पटकावले. या खेळाडूंना प्रशिक्षक सुधाकर उळेकर व ज्ञानेश्वर गाडे यांनी मार्गदर्शन केले.
पदक प्राप्त खेळाडू
सुवर्ण पदक-समर्थ गायकवाड , रौप्य पदक-  शरण चंदनशिवे ,संयोगिता हाजगुडे,रूषीकेष पाठक, स्वरंजन क्षीरसागर  कांस्य पदक -प्रथमेश अमृतराव, गार्गी पलंगे,नयन मगर, विश्वास कदम

 
Top