तेर/प्रतिनिधी-
जागतिक एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने एड्स जनजागरण रॅली काढण्यात आली. त्याचा शुभारंभ सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कोठावळे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी, महाराष्ट्र संत विद्यालयाचे प्राचार्य एस. एस. बळवंतराव कोळपे, महादेव भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एड्स रोगाविषयी जनजागरण करणा-या घोषना देत महाराष्ट्र संत विद्यालयाच्या विद्याथ्र्यानी गावात रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. कोठावळे यांनी एड्स रोगाविषयी समज गैरसमज याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामीण रुग्णलयाच्या अधिपरिचारिका सविता चाकाटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लक्ष्मीकांत मुंडे, प्रिया सुर्यवंशी, सचदेव शिरसठ, संतोष सरवदे, प्रशालेचे डी. टी. काळे, जे. एस. मुळे यांची उपस्थिती होती.