कोल्हापूर येथे २५ सप्टेंबर रोजी होणा-या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी पानवाडी (ता. उस्मानाबाद) येथील सुप्रिया सुभाष कदम ची १७ वर्षाखालील संघात निवड झाली आहे. उस्मानाबाद जिल्हयाच्या इतिहासात प्रथमच हॉकी क्रीडा प्रकारात मुलींच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याची पहिलीच वेळ आहे.
या निवडीबद्दल उस्मानाबाद येथील समता माध्यमिक विद्यालयाच्यावतीने संस्थेचे उपाध्यक्ष महादेव एडके यांच्या हस्ते सुप्रिया कदम हिचा पालकासह सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एन.आर.सोनार , वाघमोडे, मुख्याध्यापिका सौ.एडके, मुख्याध्यापक ए.जी.जोगदंड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
समता विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलीच्या संघाची नांदेड येथे झालेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत विजेतेपद मिळाल्याने या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. फेरोज शेख, अशपाक सर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.
