तुळजापूर/प्रतिनिधी-कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास 29 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून गुरुवारी (दि.19) तुळजाभवानी मातेच्या छबिना वाहनांची रंगरंगोटी करण्यात आली. तसेच नवरात्रोत्सवातील इतर कामांनाही वेग आला आहे.
तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्रोत्सवाचा रविवारी (दि.29) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणासह देशभरातून लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. घटस्थापना ते अश्विन पौर्णिमा 15 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या तयारीला मंदिर संस्थान जोमाने कामाला लागला असून गुरुवारी तुळजाभवानी मातेचा छबिना वाहनांची रंगरंगोटी करण्यात आली. कुलस्वामिनीचा वर्षातील सर्वाता मोठा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव असून मंदिर संस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. 29 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून विविध रंगरंगोटीचे काम सुरू आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवात मातेच्या विविध साहित्याचे नियोजन करण्यात येत आहे.