उस्मानाबाद/प्रतिनिधी -प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने उस्मानाबादकरांच्या सेवेसाठी पहिल्या टप्प्यात दोन स्कूल बस उस्मानाबाद नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. सदरील स्कूल बस मोफत स्वरूपात शहरात विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणार आहेत. या स्कूल बस सुपूर्द करताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, जिप सदस्य धनंजय सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, जिप सदस्य बालाजी जाधवर, नगरसेवक सोमनाथ गुरव, बळवंत तांबारे, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, रवी कोरे आळणीकर, अभिजित देशमुख यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
 
Top