उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील समता माध्यमिक विद्यालयातील १४ वर्षाखालील मुलींच्या हॉकी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेत मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
नांदेड येथे झालेल्या विभागीय हॉकी स्पर्धेत समता माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने दणदणीत विजय मिळविला असून संघाची कोल्हापूर येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघामध्ये स्वराली नलावडे (कर्णधार), दिव्यासाठे, विशाली गोरे, सुप्रिया कदम, तनुजा कुलकर्णी, प्रेरणा देशमुख, राजनंदिनी लोमटे, अनुजा पोतदार, दिव्या जाधव, रूपाली पाटील, राजश्री विभुते यांचा समावेश आहे. या यशस्वी खेळाडुंचा समता सेवाभावी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एन.आर.सोनार, उपाध्यक्ष महादेव एडके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव एस.एस.वाघमोडे, प्रशासकीय अधिकारी सी.व्ही.थोरात, संचालक वाघमोडे, एस.आर.वेदपाठक, आर.एन.डोके, मुख्याध्यापक ए.जी.जोगंदड, मुख्याध्यापीका एस.एम.एडके आदी उपस्थित होते. यावेळी क्रिडा मार्गदर्शक फिरोज शेख, अशपाक सर, सुरभी भोसले, क्रीडा शिक्षक पी.जी.बोबडे यांचाही सत्कार करण्यात आला.
श्रीमती एस.एम.धावटे यांनी सुत्रसंचालन केले. ए.पी. आदटराव यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.