तुळजापूर/प्रतिनिधी-महाराष्ट्राची कुलस्वामिनी, देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवा पूर्वीच्या सात दिवसाच्या मंचकी निद्रेस  रविवार दि 22 सप्टेंबर 2019 च्या राञी पासून आरंभ होणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने नवरात्र महोत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार रविवार दि. 22 रोजी तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. नंतर ही सात दिवसाची मंचकी निद्रा संपुन रविवार दि. 29 रोजी देवीची मुर्ती पहाटे सिहांसनावर अधिष्टीत केल्यानंतर दुपारी 12 वाजता विधीवत घटस्थापनेनंतर शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
रविवार दि. 22 रोजी सांयकाळी साडेसहा वाजता देवीजीस भाविकांचे दही, दुध, पंचामृत अभिषेकपुजा केले जाणार आहेत नंतर मुर्ती स्वछ करण्यात येणार असुन नंतर ही मुर्ती अलगद हातावरुन ती  सिंह गाभा-या शेजारी असणा-या शेजघरात चांदीच्या  पलंगावर निद्रस्त केली जाणार आहे. यानंतर तिथे धुपारती केल्यानंतर देवीच्या मंचकि निदे्रस आरंभ होणार आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीतील भक्त, पुजारी वृंद देविच्या मंचकी निद्रा काळात विश्रांतीसाठी गादी उशी वापरत नाहीत.  या कालावधीत देविजीस सकाळ संध्याकाळ सुगंधी तेलअभिषेक केला जातो.

 
Top