तुळजापूर/प्रतिनिधी-तुळजापूर श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरापाठीमागे असणारी महसूलची दहा आर जागा आरादवाडी भागातील लोकांच्या स्मशानभूमीसाठी महसूल खात्याने नगर परिषदच्या ताब्यात दिली आहे. श्री तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे असणा-या आरादवाडी व भिमनगर भागातील नागरिकांसाठी स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी गैरसोय होत होत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने बारालिंग मंदिर परिसरात असणारी 215/6 मधील दहा आर शासकीय जागा स्मशानभूमीसाठी नगर परिषदेकडे दिल्याने येथे स्मशानभूमी मार्ग मोकळा झाला आहे. ही जागा गुरुवारी (दि.19) नगर परिषदेच्या ताब्यात दिली. या जागेवर अनेकांनी आपला हक्क सांगितला होता. त्यांचा डोळा या जागेवर होता. मात्र शासानाने ती नगर परिषदेला स्मशानभूमीसाठी दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
Top