
तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील जळकोट येथे गुरूवारी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गावातील संभाजीनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे कुटूंबियाची मोठी तारांबळ उडाली.
या घटनेची माहिती समजताच पं.स उपसभापती अशोक पाटील, मनेस जिलाध्यक्ष प्रशांत नवगिरे, शकील मुलानी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. ग्रामविकास अधिकारी पारे यांना या संदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी वजीर शेख, शब्बीर शेख, कल्याणी मडोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.