उस्मानाबाद /प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा विभागामार्फत एकदिवशीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अर्षल सय्यद हे लाभले होते. याप्रसंगी हर्षल सय्यद यांनी विविध महापुरुषांचे दाखले देऊन व्यक्तिमत्व विकासाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले यावेळी विद्याथ्र्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचे निराकरण त्यांच्याकडून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. इंदलकर हे लाभले होते त्यांनी आपल्या अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्याथ्र्यांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा विकास करणे व ते कोणत्या क्षेत्रात आपले करियर घडवतात त्या क्षेत्रात त्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय असे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. उगीले यांनी केले तर सुञ संचालन प्रा. मारुती लोंढे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा संदीप देशमुख प्रा बालाजी कऱ्हाडे डॉ नितीन गायकवाड प्रा राजा जगताप प्रा डॉ नागरगोजे हे उपस्थित होते.