उस्मानाबाद/प्रतिनिधी-अभियंता हा समाजातील नवनविन गोष्टींचा कणा आहे.अभियंते हे समाजात सृजनशीलतेचे कार्य करत आहेत असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष  तथा भाजपा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कँपसमधील एस.पी.पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन व नुतन विद्यार्थी स्वागतसोहळा प्रसंगी केले.यावेळी दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत कावरे,सामनाचे जिल्हा प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी,शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा.आर.जी.लगदिवे,इंजि.राहुल गवळी,लातुरचे कार्यकारी अभियंता निलेश हंबीरे,इंजि.अर्शद सय्यद व प्राचार्य अमर कवडे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,अभियंता,शिक्षक,वकील,डॉक्टर हे समाजातील महत्वाचे घटक आहेत.शिक्षक हा समाजाला दिशा देतो,डॉक्टर हा समाजाला बर करतो,वकील हा समाजात न्यायदान करण्याचे कार्य करतो तर अभियंते हे सृजनशीलतेचे कार्य करतात.आतापर्यंत आपल्या देशात वा जगात जे जे नवनवीन बदल झाले ते आभियंत्यानी आपल्या बुध्दीकौशल्य व नवनिर्मितीच्या बळावर केले आहेत.नविन विद्यार्थ्यांनी ही पुढील चार वर्ष या कॉलेजमध्ये नवनविन गोष्टी शिकाव्यात तसेच जे नविन तंत्रज्ञान व माहिती घ्यावी व आपल ज्ञान अद्ययावत ठेवावे असे आवाहान केले.
यावेळी दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत कावरे,सामनाचे जिल्हा प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी,शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा.आर.जी.लगदिवे,इंजि.राहुल गवळी,लातुरचे कार्यकारी अभियंता निलेश हंबीरे,इंजि.अर्शद सय्यद यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले सुत्रसंचलन अरबाज शेख, प्रास्ताविक प्रा.आर.एस.लोमटे,तर आभार प्राचार्य अमर कवडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा.आशिष उंबरे प्रा.डी.ए.पाटील, प्रा.पी.बी.गुंड, प्रा.डी.एस.पडवळ प्रा.एस. क्यु.सय्यद, प्रा.एस.बी.गव्हाणे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top