उस्मानाबाद/प्रतिनिधी- तालुक्यातील कौडगाव येथे महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या वतीने (महानिर्मिती) 50 मेगावॅट सौर ऊर्जानिर्मितीच्या प्रकल्पाचे भूमीपूजन बुधवारी (दि.18) सायंकाळी पार पडले. 200 कोटींच्या या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 83 दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती होणार आहे.
कौडगाव येथे सुमारे 118 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासोबतच परिसरात अन्य उद्योग उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेक वर्षापूर्वी जमिनीची संपादन झाले होते. मात्र, सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लागत नव्हता. अखेर विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी या प्रकल्पाचे भूमीपूजन तातडीने उरकण्यात आले असून, लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.भूमीपूजन समारंभासाठी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, सौर ऊर्जा प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रभाकर निखारे, सरपंच प्रतिभा बालाजी सुतार यांची उपस्थिती होती. निखारे यांनी प्रकल्पाची माहिती दिली.कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,नितीन काळे, प्रभाकर मुळे, व्यंकट गुंड, सतीश देशमुख आदी उपस्थित होते.
तयार झालेल्या विजेचा दर 2.92 रुपये
कौडगावमध्ये सुमारे 118 हेक्टर जागेवर उभारत असलेल्या 50 मेगावॅट प्रकल्पात दरवर्षी सुमारे 83 दशलक्ष युनिट्स सौरऊर्जा निर्माण होणार असून, हा प्रकल्प पोलिक्रिस्टलाईन फोटोव्होल्टाईक तंत्रज्ञानाने युक्त आहे. मेसर्स भारत हेवी इलेक्ट्रिकल्स या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत उभारल्या जाणा-या या प्रकल्पाची किंमत सुमारे 200 केाटी रुपये असून, इथे तयार होणा-या विजेचा दर प्रतियुनिट 2.92 रुपये इतका असेल.