उमरगा/प्रतिनिधी- पावसाळा सुरू होवून तीन महिने लोटले तरी समाधानकारक व दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस व्हावा म्हणून तालुक्यातील सात गावातील मंदिरात येथील नवनाथ भक्त प्रवचनकार माधव महाराज सूर्यवंशी यांनी नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ पारायन सोहळ्याची सुरूवात गुरू पुष्यामृत मुहूर्तापासून सुरुवात केली असून सद्यस्थितीत कराळी येथील आगजप्पा मंदिरात ग्रंथ पारायण सोहळा सुरू आहे.
मराठवाड्यातील सततची अवर्षणग्रस्त स्थिती पाणी टंचाई, दुष्काळ कायमस्वरूपी हटावा तलाव, नदी, नाले, ओढे पाण्याने तुुडूंब भरावीत, पशुधनास चारा पाण्याअभावी वन्यप्राणी व जनावरांचे होणारे हाल थांबून चारा उपलब्ध व्हावा यासाठी उमरगा येथील नवनाथ भक्त पारायण माधव महाराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दिड महिन्यापासून तालुक्यातील कवठा येथील विष्णू मंदीरात, मातोळा येथील हनुमान मंदिर, कुंभारवाडा देवी मंदिर, श्री दत्त मंदिर, उमरगा, संभाजीराजे गणेश, तोरंबा येथे दिलालपुर हनुमान मंदिर या ठिकाणी सात दिवसीय नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ पारायन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.बुधवारपासून कराळी येथील आगजप्पा मंदिरात दुष्काळ निवारणासाठी नवनाथ भक्ती कथासार, दत्तप्रबोध ग्रंथ, काशीखंड, पदमपुराण ग्रंथ पारायण सोहळा करण्यात येत असून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.नवनाथ भक्त प्रवचनकार माधव महाराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.