उस्मानाबाद /प्रतिनिधी-
रौशन ह्या नावाने हिंदी गझल लिहिणा-या युवराज नळे यांच्या कशिश या गझल संग्रहाचा प्रकाशन समारंभ आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात हिंदी साहित्यिक प्रा. डॉ. सुर्यनारायण रणसुभे तसेच गझलकार अजयजी पांडे लातूर ,मसाप अध्यक्ष नितीन तावडे,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे , पं.स.चे सभापती बालाजी गावडे, राजाभाऊ पाटील उपस्थित होते .यावेळी बोलताना डॉ रणसुभे म्हणाले की, भवतालाचे निरीक्षण करुन आतल्या उमाळ्याने कवी लिहित असतो. नळे यांच्या कवितेत प्रेम, सत्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न, व्यवस्था विरोध आणि याबरोबरच माणूसपणाकडे जाणा-या गझलांचा समावेश आहे आणि हे त्यांचे बलस्थान आहे. अस्वस्थता हा कवीचा किंवा कलावंताचा स्थायीभाव असतो.म्हणूनच तो जग बदलायची भाषा परखडपणे करतो. त्यांच्या कवितेला निश्चितच चांगले भवितव्य आहे.
यावेळी अजय पांडे यांनी गझलबद्दलचे बारकावे विषद करून चांगल्या गझल कशी असते, याबाबतचे विवेचन करून रौशन च्या गझलेबद्दल समाधान व्यक्त केले. तर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. नेताजी पाटील यांनीही शुभेच्छा देऊन उस्मानाबाद शहरात होत असलेल्या साहित्यिक कार्यक्रमांना सभागृह मोफत देणार असल्याचे जाहीर केले .
यावेळी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, साहित्यिक नेहमी आपल्या तंद्रीत राहून समाजातील शोषणाविरोधात बोलत असतो. म्हणून समाजात सत्याचे अधिष्ठान निर्माण करण्यासाठी साहित्य चळवळीला बळ देणे हे समाजाचे उत्तरदायित्व ठरते. आपण सर्वजण मिळून ही चळवळ निश्चित वाढवू. युवराज नळे यांच्या गझल खूप प्रभावी असल्याचेही त्यांनी सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती सर्वांना होण्यासाठी व पर्यटन वृध्दी च्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासाठी देखील युवराज यांनी उस्मानाबाद पर्यटन विकास समिती च्या माध्यमातून भरीव कार्य केलेले आहे व करत आहेत हे सांगून त्यासाठी त्यांना त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. 93वे आखिल भारतीय साहित्य संमेलन सर्व मिळुन यशस्वी करु असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . आपल्या प्रास्तविकात म.सा.प. अध्यक्ष नितीन तावडे यांनी साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा सादर करून कशिशला ला शुभेच्छा दिल्या. युवराज नळे यांनी कशिश संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाराणी कुदळे यांनी केले तर आभार माधव गरड यांनी मानले.सदर कार्यक्रम मराठवाडा साहित्य परिषदेने घेतला .यावेळी संपूर्ण सभागृह साहित्यिक, रसिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खचाखच भरले होते.