उस्मानाबाद/प्रतिनिधी-होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना व मित्र पक्ष यांची महायुती असून, शिवसंग्रामला राज्यातील 12 जागा देण्याची मागणी शिवसेना-भाजपकडे केली असून, या 12 जागेत उस्मानाबाद-कळंब या जागेचा समावेश आहे. या मतदारसंघात शिवसंग्राम व मित्रपक्षाचे जाळे भक्कम असल्यामुळे आम्ही ही जागा लढवून निश्चित विजयश्री खेचून आणून शकतो. त्यामुळे उस्मानाबाद-कळंब ची जागा शिवसंग्राम पक्षाला सोडवी अशी अग्रही मागणी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे-पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
येथील रोमा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन केळे, शिवसंग्रामाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भुतेकर, चंद्रकांत इंगळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खापे-पाटील म्हणाले की, नुकतेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी गेल्या 15 वर्षात जिल्ह्याचा काहीच विकास केला आहे. त्यांचे मित्रपक्ष म्हणून आम्ही स्वागत करतो. भाजपने राणाजगजितसिंह पाटील यांना उमदेवारी दिली तरी आम्ही त्यांचा प्रचार करू. मात्र मित्र पक्षांना द्यावयाच्या जागेमध्ये उस्मानाबाद-कळंब या जागेचा आम्ही आग्रह धरला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधितांकडे आमची मागणी कशी योग्य आहे ते पटवून दिले आहे. कारण आम्ही शिवसंग्रामच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम केले असून, कार्यकर्त्यांचे जाळे देखील चांगले मजबुत आहे. जर ही जागा आमच्या पक्षास मिळाली तर आम्ही कोणत्याही क्षणी गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.