धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यरत अधिपरिचारका आणि परिसेविका यांना समपदावर समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने दि.3 जुलै रोजी करण्यात आले. 

संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या आदेशान्व धाराशिव येथील 37 अधिपरिचारिका व 6 परिसेविका यांचे बदली आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य संचालक यांच्या आदेशाने सदरील आधी अधिपरिचारिका व परिसेविका यांना कार्यमुक्त करू नये असे जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव यांना आदेश केले होते. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय नवनिर्मित असून जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या अधिपरिचारीका व परिसेविका यांच्या बदल्या इतरत्र झाल्यास रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊन रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सद्यस्थितीत सर्व परिसेविका व अधिपरीचारिका यांच्या मुलाचे शालेय शिक्षण सर्व प्रक्रिया पार पाडल्या असल्यामुळे शिक्षणावर मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यांच्या सर्व मुला मुलींचे ऍडमिशन झाल्यामुळे त्यांना इतरत्र शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे कठीण आहे. यामुळे सर्व शिक्षणाचे विपरीत संकट आहे. यापूर्वी अधिपरिचारीका व परिसेविका यांनी शासनास समपदावर समायोजन करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बदल्याचा घाट घातला असून त्यांचे कौटुंबिक वातावरण यामुळे दूषित झाले आहे. या बदली आदेशामुळे सर्व अधिपरिचारिका व परिसेविका यांची मानसिक खच्चीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वरील प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्यात येऊन ते बदली आदेश तात्काळ रद्द करावेत या मागण्यासाठी  निदर्शने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी कार्याध्यक्ष मंगेश सुरवसे, महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष संगीता फंड,  सचिव मनोज शेळके, उपाध्यक्ष छत्रपाल वाघमारे, खजिनदार सुवर्णा देशमुख, कार्याध्यक्ष रिबेका भंडारे, 

संध्या वर्पे, प्रेमा निंबाळकर, सुरेखा गवळी, वहिदा शेख, जयश्री ढोणे, सुरेखा कोकाटे, सुलभावती कौरव, मीना शेंडे, सुनिता शितल, आकाश मगर, मंगेश सुरवसे, मीना गोरे, वर्षाराणी बनसोडे, सविता शेंडगे, शीला म्हमाने, सीमा ऊलमुनगे, गिरीजा परसे, अश्विनी सोमासे, शोभा गायकवाड, अश्ताज तांबोळी आदींसह अधिपरिचारीका व परिसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 
Top