उस्मानाबाद/प्रतिनिधी-उस्मानाबाद-कळंब या मतदारसंघासाठी सर्व प्रक्रिया राबविण्यात येत असून, या दरम्यान कोणताही गैरप्रकार होवू नये, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी या मतदारसंघात 8 पथकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गणेश माळी आणि आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील तहसील कार्यालयात विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे उपस्थित होते. पुढे बोलताना माळी म्हणाले की, या मतदारसंघात 1 लाख 86 हजार 690 पुरूष तर 1 लाख 65 हजार 665 स्त्री तर तृतीयपंथींची 10 मतदारांची संख्या असून, आज अखेरपर्यंत या मतदारसंघातील 99.55 टक्के मतदारांना त्यांचे ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत भरता येतील. तर दि 5 ऑक्टोबरला छाननी होवून दि. 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारास आपले अर्ज माघारी घेण्यात मुदत देण्यात आली आहे. सर्वात जास्त मतदार असलेल्या केंद्रासाठी म्हणजेचे 1500 पेक्षा जास्त असलेल्या मतदारांसाठी अतिरिक्त केंद्राची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील केंद्राचा क्रमांक 332 व 333 भारत विद्यालय उस्मानाबाद आहे. तर सखी मतदान केंद्र येथील स्वयंरोजगार कार्यालया शेजारी प्रशासकीय इमारतीत उभारण्यात येणार असून, दिव्यांग मतदारांसाठी जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या शेजारी उभारण्यात येणार आहे. या केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी हे दिव्यांगच असणार आहेत. तर आदर्श मतदान केंद्राची संख्या देखील 1 असून, सदरील केंद्र नगर परिषदेच्या शाळा नंबर 14 व उर्दु शाळा क्रमांक 8 खाजानगर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या मतदान केंद्रात मतदानासाठी येणार्या नागरिकांस पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले जाईल. त्याचबरोबर याठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, लहान मुलांना संभाळण्यासाठी मैदानावर आशा कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यांची सेवा केली जाणार आहे. त्याचबरोबर या केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. या मतदारसंघात 42 क्षत्रीय अधिकार्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच कळंब तालुक्यातील रांजणी, कळंब शहरातील परळी रोड, कळंब तालुक्यातील येरमाळा, उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी रोड, कौडगाव, औसा रोड येथील सुतगिरणी येथे स्थिर सर्व्हेक्षण पथके नियुक्त केली आहेत. या पथकावर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या मतदारसंघात 407 मतदान केंद्राची संख्या असून, पडदानशीन मतदान केंद्राची संख्या 41, दिव्यांग मतदान केंद्राची संख्या 1, महिला कर्मचारी नियुक्त मतदान केंद्राची संख्या 1, आदर्श मतदान केंद्राची संख्या 1 असून, उर्वरित ठिकाणी या माध्यमातून अधिकारी आपले चोख बजावतील यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रामेश्वर रोडगे यांची तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मंजुषा लटपटे, आर. आय. केलुरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.