तुळजापूर/प्रतिनिधी- पुणे येथील देवीभक्तान श्री तुळजाभवानी मातेस ज्या वाहनांवर छबिना काढला जातो असे सुमारे तीनशे किलो चांदीचे आवारण असलेले हत्ती रुपी छबिना वाहन रविवार दि22रोजी सांयकाळी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान ला अर्पण केले.पुणे येथील देवीभक्त विजय ऐकनाथ उंडाळे यांनी साडेनऊफुट उंच साडेचार फुट रुद उंचीचे हत्ती वाहनावर चांदीचे मखर असलेले छबिना साठी लागणारे छबिना वाहन अर्पण केले. या पुर्वी उंडाळे यांनी मंदीर संस्थान ला चांदीची मुर्ती अर्पण केली होती.