तुळजापूर/प्रतिनिधी-
विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन शिवसेना शेतकरी मदत केंद्राच्या माध्यमातून शेतक-यांच्या पीक कर्ज व पीक विमा संदर्भातील समस्या जाणून घेऊन त्या अनुषंगाने "दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी" विभागीय कार्यालय, सोलापूर येथे प्रत्यक्ष भेट देवून, दि. 01 सप्टेंबर 2019 रोजी तक्रार निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील संबंधित बँकेकडे 12 कोटी विम्याची रक्कम वर्ग केली. त्यानंतर ही जवळपास 2000 शेतक-यांची रक्कम मिळणे बाकी होते. याबाबत शेतक-यांना विम्याची रक्कम त्वरित देण्यासाठी दि. 26 सप्टेंबर 2019 रोजी निवेदन देऊन, पैसे नाही मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने दि. 03 ऑगस्ट 2019 रोजी हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
त्यानुसार, आंदोलन करण्यासाठी विमा विभागीय कार्यालय सोलापूर येथे व तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिकांसह संजयमामा निंबाळकर, तालुकप्रमुख मा. जगन्नाथ गवळी, विभागप्रमुख धुळाप्पा रक्षे, अनिल छत्रे गेले असता विभागीय कार्यालय अधिकारी श्री. करपे साहेब यांनी शिवसेना नेते संजयमामा निंबाळकर व तालुकाप्रमुख मा. जगन्नाथ गवळी यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून दि. 16 ऑगस्ट 2019 पर्यंत शेतक-यांच्या खात्यावर विम्याची रक्कम वर्ग करू असे लेखी आश्वासन दिले. हे आश्वासन लेखी स्वरूपात दिल्यानंतरच आजचे हलगीनाद आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजयमामा निंबाळकर, शिवसेना तालुकप्रमुख जगन्नाथ गवळी, विभागप्रमुख धुळाप्पा रक्षे, अनिल छत्रे,  बाळू सिरसट,  दशरथ पाटील, गोविंद पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top