तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर शहरात  पोलीस ठाण्याअंतर्गत गणेश उत्सव व मोहरम उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सव शांततेत पार पडावा. या पाश्र्सभूमीवर पोलिस अधिक्षक राज तिलक रोशन व उपपोलिस अधिक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस कर्मचा-यांसह पथसंचलन करण्यात आले.
भवानी रोड , आंबेडकर चौक , गोलाईसह  शहरात दि .3 सप्टेंबर रोजी दुपारी पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिस निरिक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र असल्याने शहराची लोकसंख्या व गणेश मंडळांची संख्या तुळजापूर पोलिस स्टेशन अंतर्गत 91 व 34  गणेश मंडळे शहरात आहेत. तसेच 57  मंडळ ग्रामीण भागात आहेत. पाहता भक्तांची सुरक्षा आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

 
Top