तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अकरा कोटी रुपये खर्च करुन देवीची मुर्ती निर्माण करीत आहे. परंतु देवीमुर्ती निर्माण करण्याऐवजी सर्वसोयी सुविधा नियुक्त असे भव्य रुग्णालय उभे करावे अशी मागणी अँड शिरीष कुलकर्णी व पुजारी मंडळ, माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून केली आह.े
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, तिर्थक्षेञ तुळजापूर येथे अद्यावत रुग्णालय नसल्याने भाविकां सोबत शहरवासियांना पन्नास किलोमीटर दूर जावुन आरोग्य सेवा घ्यावी लागते. पण यात वेळेवर उपचार न झाल्यास भाविक व रुग्ण दगविण्याची मोठी शक्यता आहे व अर्थिक भार सहन करुन उपचार घ्यावे लागत आहेत. श्री तुळजाभवानी भक्तांमध्ये वृद्ध स्ञीपुरुष, भाविक लहान बालके यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. तिर्थक्षेञ भाविकांना तातडीने अत्याधुनिक उपचार सुविधा मिळत नाही त्याचा परिणाम वेळेवर उपचार न मिळाल्याने भाविक मुत्युमुखी पडत आहेत. या पैशातुन सुसज्ज रुग्णालय उभारल्यास बेरोजगारांना रोजगार मिळेल गोरगरीबांना व भाविकांना वेळेवर उपचार मिळुन त्यांचे प्राण वाचतील आरोग्य सेवा तात्काळ कमी खर्चात मिळाल्यामुळे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या नावलौकिकात वाढ होईल व मंदीर सामाजिक बांधलिक जोपासत असल्याचे दिसुन येईल .
तिर्थक्षेञ परिसरात मोठ्या प्रमाणात शाषकीय जमीन उपलब्ध असल्याने सुसज्ज रुग्णालय उभारुन अल्पदरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी याकामी देवीचे श्रीमंत भक्त अर्थिक मदत देण्यास पुढाकार घेतील असे निवेदनात म्हटले आहे