उस्मानाबाद/ प्रतिनिधी - धनगर आरक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्या माध्यमातून धनगर आरक्षण न्यायालयीन लढा अंतिम टप्यात आला असून या न्यायलयीन लढ्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आरक्षणाच्या लढ्यामध्ये धनगर समाजातील प्रत्येकाने काहीतरी योगदान द्यावे यासाठी दानशुर व्यक्तींनी न्यायालयीन लढ्याचे साथीदार होण्यासाठी आर्थिक मदत करण्याची गरज असल्याने रविवार दि.२२ रोजी जत्रा फंक्शन हॉल उस्मानाबाद येथे धनगर आरक्षण न्यायालयीन लढा व विचार मंथन मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास मार्गदर्शन करण्या करीता पुण्यश्लोक महाराणी अहील्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष मधु शिंदे, सचिव ऍड.मुरारजी पाचपोळ, डॉ.जय प्रसाद बघेल, प्रा. कावळे, सुधाकर शेळके हे उपस्थित राहणार आहेत. आरक्षण संदर्भात कोणाला काही शंका-कुशंका असल्यास, केस विषयी माहिती हवी असल्यास, ती सविस्तर माहिती मान्यवर मंडळी आपणास देतील. या वेळी आरक्षण संदर्भातील संपूर्ण माहिती पावर पॉईंटद्वारे उपस्थितांना देण्यात येईल. यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाड्याचे नेते सुरेशभाऊ कांबळे, पु.अ.स.प्र.मंचचे मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी केले आहे.