परंडा /प्रतिनिधी -
मंत्री डॉ. प्रा.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ कारखान्याचे संचालक मा.अर्थ व बांधकाम सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या उपस्थितीत तालुक्यातील मौजे आसू येथिल पाझर तलावामध्ये शिराळा उपसा सिंंचन योजनेच्या टॅंक नंबर सात पासून अडीच किलोमीटर चारीचे स्वखर्चातून खोदकाम केले.व चाळिशी पाझर तलावामध्ये पाणी सोडण्यात आले. या पाझर तलावात पाणी सोडल्यामुळे किमान 70 ते 80 टक्के आसु गावा मधील शेतीला फायदा होणार आहे. तसेच गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.सावंत यांनी पाणी सोडण्याचे वचन पुर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने जि.प.सदस्य धनंजय सावंत यांचे जंगी स्वागत करून त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दत्ता साळुंके, शिवसेना जिल्हा संघटक मेघराज पाटील गावातील कल्याण जगताप, विकास यादव, विकास जाधव, चतुर्भुज जाधव, श्रावण गणगे , गोरख खुने, महेश इतापे, मनोज बुरंगे ,मोहन वायकुळे , धनाजी यादव, नवनाथ शिंदे, आबा माने, नाना बुरंगे, अक्षय जाधव, डीगा माने, लाला शिंदे, परमेश्वर जाधव, रघुनाथ मासाळ, शिवाजी मासाळ, तुकाराम मासाळ, हनुमंत वायकुळे, धनाजी मासाळ सह आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
