लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जि.प.प्रशालेचे माध्यमिक शिक्षक लक्ष्मन चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शालेय शिक्षण क्रक्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते देण्यात आला.
हा सत्कार सोहळा कार्यक्रम मुंबई बांद्रा येथील रंगशारदा मंदिरात संपन्न झाला. यावेळी प्रमुख म्हणुन कपिल पाटील, शिक्षण आयुक्त शैलेश सोळुंके, शिक्षण संचालक दिनकर पाटील, अदि उपस्थित होते.या प्रशालेतील शिक्षक लक्ष्मन चव्हाण यांनी नौकरीत असूनही एम.एड.चे शिक्षण पूर्ण केले असुन, तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक वेळा काम केले. व गरीब कुटूंबात जन्माला आल्याने शेतकरी, गरीबांच्या मुलांना ज्ञानदान करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याने यांचा परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top