वाशी/प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील पारा येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकित शिवसेना प्रणीत पेनलचा विजय झाला. शिवसेना प्रणीत पेनल चे सरपंच पदाचे उमेदवार राजेंद्र काशिद यांचा 176 मतांनी विजय झाला. सर्वपक्षीय विरुद्ध शिवसेना अशा झालेल्या तिरंगी लढतीत अखेर शिवसेनेने बाजी 31 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवार (दि. 3) रोजी जाहीर झाला.
सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालय वाशी येथे मतमोजणी पार पडली. या मतमोजणीत जनतेतून सरपंच म्हणून शिवसेनेचे राजेंद्र पांडुरंग काशीद हे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रक्र.1मध्ये शिवसेनेचे अतूल छंदर चौधरी, मिनाबाई सुंदर माळी,शोभा अंकुश फुरडे, प्रभाग क्रक्र. 2 मध्ये भाजपचे महेश महारूद्र खोले,बाजीराव उद्धव भराटे , आशा भराटे, प्रभाग 3 मध्ये शिवसेनेचे ययाती मोहळकर,भाजपचे उध्दव शेळके,प्रियंका शिनगारे,प्रभाग क्रक्र.4 मध्ये शिवसेनेचे महेंद्र गवळी भाजपचे आशाबाई काळे हे उमेदवार निवडूण आले आहेत.
 यावेळी नायब तहसिलदार भालचंद्र  यादव , निवडणूक निर्णय अधिकारी बळीराम राठोड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस.डी आंबेवाडीकर ,मास्टर ट्रेनर संभाजी भांडवले ,पंढरीनाथ किंगरे , विनोद तळेकर  यांनी काम पहिले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
 
Top