उस्मानाबाद/प्रतिनिधी-जिल्हयातील भूम-परंडा-वाशी येथील कॉंग्रेस अनेक पदाधिका-यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. प्रवेश करणा-यामध्ये जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चेडे, परंड्याचे माजी नगराध्यक्ष सुभासिंह सिध््दीवाल, भूमचे माजी नगराध्यक्ष विजयसिंग थोरात, महादेव अंधारे आदी प्रमुख नेत्यांसह सोसायटी चेअरमन, सरपंच आदींनी मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला.
गेल्या १५ दिवसापासून कॉंग्रेस मधला एक गट फुटीच्या उंबठ्यावर असल्याची चर्चा सुरू होती. उस्मानाबाद जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी या संदर्भात भूम-परंडा-वाशी तीन तालुक्यातील आपल्या मित्र परिवारासहीत कॉंग्रेस पदाधिका-यांच्या गाटीभेटी घेतल्या होत्या. शिवसेनेचे जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी प्रशांत चेडे यांचा शिवशक्ती सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेतल्यापासून चांगले संबंध निर्माण झाले हेाते. त्यामुळे पालकमंत्री सावंत यांनी प्रशांत चेडे सहीत सर्व सहका-यांना शिवसेना प्रवेशाचा मार्ग सुकर केला.
पालकमंत्री तानाजी सावंत, खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर, माजी आ.ज्ञानेश्वर पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये प्रशांत चेडे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव अंधारे, वाशी तालुकाध्यक्ष बिभिषण खामकर, भूम तालुकाध्यक्ष आण्णासाहेब देशमुख, परंडा तालुकाध्यक्ष सुभाषसिंह सिद्दीवाल, भूमचे माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, वाशी तालुका उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, वाशी नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, वाशी गट नेता प्रसाद जोशी यांच्यासह कांही सरपंच व अनेक गावचे सोसायटी कांही चेअरमन, बाजार समितीचे कांही संचालक यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आमदारावर नाराज
पु.वि.लोकराज्यशी बोलताना कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार लादले जातात. आघाडी धर्म म्हणून आम्ही प्रचार करून निवडूण आणतो, त्यानंतर मात्र भूम-परंडा-वाशी आमदारर कसल्याही प्रकारची संधी किंवा आमच्या समस्यांकडे लक्ष भी दिले जात नाही, त्यामुळे भूम-परंडा-वाशी तीन ही तालुक्यात प्रचंड नाराजी होती.विद्यमान पालकमंत्री तानाजी सावंत, जिल्हला कर्तबगार मिळालेले आहेत.त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे सांगितले.