भूम/प्रतिनिधी-उस्मानाबाद जिल्हा शाळा निहाय्य मल्ल तालुकास्तरावरून विजय मिळवीत जिल्हा स्पर्धेमध्ये भाग घेऊन तीन निकाली कुस्त्या जिंकून राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड होण्याचा मान भूम गुरूदेव दत्त हायस्कुलचा  विद्यार्थी  असलम जमादार 41 वजन  गटात  प्रथम क्रक्रमांक मिळवला असून राज्यस्तरीय साठी लातुर येथे  खेळल्या जाणारी स्पर्धा  साठी त्यांची एकमेव निवड झाली आहे.
अस्लम जमादार हा भूमचे मल्ल मामु जमादार यांचा पुत्र असून वस्ताद हुसेन सय्यद यांचा तो पठ्ठा आहे. अस्लमच्या कामगिरीने सर्वत्र त्याचे कौतूक होत असून भाजपा नेते संजय नाना गाढवे यांनी त्याचा सत्कार केला.या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष आदम भाई शेख, रामभाऊ बागडे नगरसेवक किरण जाधव, सुनील थोरात व पत्रकार बांधव उपस्थित होते.

 
Top