तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शादीय नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने राजेशहाजी महाराद्वारासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर सप्तरंगी दिव्यांनी उजळून निघाले आहे. महाद्वारावरील थ्रीडी रूपातील श्री भवानी मातेसह शिवरायांची चित्रफीतही भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.
श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवाच्या यंदाच्या विद्युत रोषणाईचे खास वैशिष््टाये म्हणजे राजेशहाजी महाद्वारावरील चित्रफीत छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना व महिषासुराचा वध करतानाचे श्री तुलजाभवानी मातेचे प्रसंग चित्रफीतीत साकरण्यात आले आहेत. श्री तुळजाभवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचे विविध प्रसंग चित्रफीतून साकारण्यात आल्याने ही चित्रफीत भाविकांसाठी खास आकर्षण ठरली आहे. ंसपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई केल्याने संपूर्ण मंदिर परिसर सप्तरंगी विद्युत रोषणाई ने उजळून निघला आहे. या शुभारंभ जिलाधिकारी दीपा मुधोल मुढे के हाथो हुआ । इसवक्त तहसीलदार सौदागर तांदळे, प्रशासकीय व्यवस्ािापक यांगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्यासह भाविक मोठ्या संख््येने उपस्थित होते. 
 
Top