उस्मानाबाद/प्रतिनिधी-रूपामाता समूहाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एक लाख 21 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याचा धनादेश समूहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकट गुंड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला.मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पाडोळी (आ.) ता. उस्मानाबाद) येथे आल्यावर मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी अॅड. गुुंड यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघात अपेक्षित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. यामध्ये नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे, निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेस अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार निधी द्यावा, राष्ट्रीय महामार्ग क्रक्र. 9 चे रखडलेले चौपदरीकरण तातडीने पूर्ण करावे, उस्मानाबाद सोलापूर रेल्वेमार्गासाठी बजेट द्यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सदस्य ज्ञानदेव राजगुरू, पाडोळीचे उपसरपंच बाबूराव पुजारी, कोंडाप्पा कोरे, दत्ता सोनटक्के, रुपामाता नॅचरल शुगरचे उपाध्यक्ष एम. के. सूर्यवंशी, अॅड. निवृत्ती कुदळे, भाऊसाहेब गुंड, अशोक पाटील, संजय दळवी, सतीश जावळे, रुपामाता बँकेचे भगीरथ जोशी, व्यवस्थापक सत्यनारायण बोधले, रुपामाता डेअरीचे व्यवस्थापक सूर्यकांत गरड उपस्थित होते.