उस्मानाबाद/प्रतिनिधी-
*प्रा. राजा निवृत्ती जगताप लिखित व थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूर प्रकाशित "गाव तेथे बुद्ध-विहार"* *या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवार, ८ सप्टेंबर २०१९ रोजी उस्मानाबाद* येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, विवेकानंद सभागृहात आयोजिला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे (सोलापूर) व भन्ते सुमेधजी नागसेन (खरोसा, लातूर) यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख असतील. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. शिवाजीराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड, प्रा. डॉ. रत्नाकर मस्के, थिंक टँक पब्लिकेशन्सचे संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे, कवी माधव जाधव कंधार—नांदेड,प्रा.डाॅ.शिवराज गोपाळे मुंबई विद्यापीठ, हे कादंबरीवर चर्चक मान्यवर म्हणून उपस्थित राहतील.
सकाळी साडे दहा वाजता होणा-या कार्यक्रमास आपण आवर्जुन उपस्थित राहावे, ही विनंती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा बदलत्या काळातील युवक हा समाज, गाव परिसरात परिवर्तनासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही संविधानमूल्ये रूजविण्यासाठी, बुद्ध विचारांची पेरणी करण्यासाठी कसा धडपडतो, याचे चिंतनशील चित्रण या कादंबरीत आविष्कृत झाले आहे. या प्रकाशन सोहळ्यास,राज्यातील इतर जिल्ह्यातील साहित्यप्रेमीही आवर्जुन उपस्थित राहाणार आहेत तरी
या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यास उस्मानाबाद व परिसरातील साहित्यप्रेमींनी  आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. राजा जगताप यांनी केले आहे.
 
Top