तेर/प्रतिनिधी- माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लहानापासून ते वृध्दांपर्यत सर्वजण मोबाईलवरच दिवस रात्र व्यस्त राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे शालेय विद्याथ्र्यांसह नागरिकांमध्ये मोबाईलच्या अती वापरामुळे विविध आजारांची लागण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शालेय जीवनात विद्याथ्र्यांनी मोबाईलचा वापर टाळून शारीरिक व्यायामासह अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे असे आवाहन जिल्हा क्रक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.
तेर ता .उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव तर पंचायत समिती सदस्य सुरेखा कदम , मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता प्रदिप पौळ , अनंत व्यास , डॉ. पियुष खटके , अनिल कचरे , माजी मुख्याध्यापक नरसिंग जेवे , विश्वनाथ अबदारे , अजिंक्य वराळे यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी इयत्ता दहावी व बारावी मध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन घवघवीत यश संपादन केलेल्या रोडगे ऋतूजा अंकुश , मस्के प्रतिक धनाजी , सोनवणे प्रियंका प्रकाश , नाईकवाडी स्वप्नाली शेषेराव , शेळके ऋतूजा रमेश , या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करुन गुणगौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव भंडारे तर सूत्रसंचलन एस यू गोडगे यांनी केले. आभार ए. बी .वाघीरे यांनी मांडले .यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.