उस्मानाबाद/प्रतिनिधी- उस्मानाबाद येथील ज्येष्ठ विधिज्ञ, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य  तथा महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे सदस्य ऍड मिलिंद पाटील यांचा उस्मानाबाद येथील मित्र परिवारांकडून सत्कार करण्यात आला.
     मिलिंद पाटील यांची काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनच्या सदस्य पदी निवड झाली, त्यानंतर  मित्र परिवारांनी आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी एकत्रित येऊन कौटुंबिक सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. 
    सत्कार प्रसंगी बोलताना एड मिलिंद पाटील म्हणाले की आज माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम माझ्या सहकारी मित्र परिवारांनी केलेले आहे, या सत्काराने मी भारावून गेलो आहे. उपस्थित मित्र परिवाराच्या वतीने सत्कार प्रसंगी मिलिंद पाटील यांना प्रतिज्ञापत्र पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी हिंदू एकजूट धाराशिव मित्रपरिवाराने देखील पाटील यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.राजेश सिंह परदेशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कमलाकर कुलकर्णी, शेषाद्री डांगे, शरदराव दिघावकर, रत्नाकर बोटवे,प्रमोद खंडेलवाल, अजित बडवे, कल्याण जोशी,सुशील कुलकर्णी,रामदास कोळगे, डी. जी. कुलकर्णी, उमाकांत देशपांडे, शरद वडगावकर, मिलिंद डावरे, महेंद्र बेदरकर, शिवानी राजेशसिंह परदेशी यांच्यासह अन्य मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.
 
Top