उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील सारोळा (बु) येथील 60 वर्षीय वृद्धास पैशाच्या कारणावरून काठीने मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी तिघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दि.19 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. सहदेव पंढरी कठारे (60 वर्षे रा.सारोळा बु.)हे दि. 19 रोजी दुपारी 1 वाजता दारू पिण्यासाठी गावातील गोपाळ भगवान कुंभार यांच्या घरी गेले होते. यावेळी गोपाळ कुंभार यांनी तू दारु पिण्यास का आलास असे म्हणत सहदेव कठारे यांच्याशी वाद घातला. तर रामकृष्ण उर्फ बिभीषण लक्ष्मण आगाशे व पारुबाई रामकृष्ण उर्फ बिभिषण आगाशे या पती-पतनीने पैशाच्या कारणावरुन सहदेव कठारे यांच्याशी वाद घालून त्यांना काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीतच कठारे यांचा मृत्यू झाला. घडला प्रकार कळताच उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी सहदेव यांचा मुलगा दशरथ कठारे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top