उस्मानाबाद/प्रतिनिधी-शहरातील तेरणा पब्लिक स्कुलच्या थ्रोबॉल संघाची जालना येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नांदेड येथे विभागीय थ्रोबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत तेरणा पब्लिक स्कुलच्या १७ वर्षाखालील संघाने विजेतेपद पटकावल्याने संघाची जालना येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवउ झाली आहे. संघामध्ये स्वप्नील माने, जयदत्त पाटील, विनायक कुंभार, विशाल खापरे, अमित लोमटे, अमित माने, तुषार मल्ला, अवधूत भोसले, संभाजी खारगे, शंतनू वीर, अदिल गाढवे, अक्षर लाके यांचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा शिक्षक योगेश ताटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल यशवंत, गुणवंत खेळाडुंचे तेरणा पब्लिक स्कुलचे अध्यक्ष एल.एल.पाटील, सचिव अनंतराव उंबरे, प्राचार्य शरथकुमार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Top