उस्मानाबाद /प्रतिनिधी-
रंगमंचकावर गेल्यानंतर अनेक लोंकांचा गोधळ उडतो, नाटकाचे पाठ केलेले संवाद विसरले जातात, त्यामुळे घोकमपट्टी म्हणजे नाटक नव्हे तर मनापासून सादर करणारी कला म्हणजे नाटक होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रविंद्र केसकर यांनी केले.
गंगाधर करंडक नाट्य एकांकीका स्पर्धोतचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उस्मानाबाद येथे ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार रविंद्र केसकर होते. प्रमुख अतिथी म्हणुन पत्रकार भिमाशंकर वाघमारे, प्रशांत कावरे, उद्योजक अभिराम पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील,अभिराम सुधीर पाटील व आदित्य सुधीर पाटील, स्वप्नील पाटील, सागर चव्हाण व अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, सागर चव्हाण् आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पत्रकार श्री केसकर यांनी कलावंतांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण केले पाहिजे. कोणताही न्युनगंड मनी न बाळगता आपल्यातील सुप्त अभिनय, कलागुणांना वाव दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा शुभारंभ रंगदेवता श्री नटराज व कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी व इतर प्रतिमांचे पुजन करुन दिपप्रज्वलाने करण्यात आला. या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत राज्यातील एकुण 34 संघ सहभागी झाले आहेत. कै. नागेश सोलंकर रंगमंचावर या स्पर्धेत राज्यातील नाट्य कलावंत आपली कला सादर करणार आहेत.
यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आदिसह राज्यातील इतर भागातील कलावंतांचा सहभाग आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाह धनंजय (नाना) शिंगाडे, अध्यक्ष विशाल शिंगाडे, सागर चव्हाण, सुगत सोनवणे, ताहेर शेख, अविनाश बनसोडे, सुरज शहापालक, विजय उंबरे, शुभम खोत, डी.जे. कुलकर्णी, राजेंद्र अत्रे, सुहास झेंडे, अरिफ शेख आदि परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन सतीश सांडभोर (पुणे), ज्योती निसाळ (मुंबई) व रितेश साळुंके (अहमदनगर) हे काम पाहत आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्?विनी मालखरे व आभार प्रदर्शन सागर चव्हाण यांनी केले.