तुळजापूर /प्रतिनिधी-
मुखमञी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भाजपच्या महाजनादेश याञेचे स्वागत भव्य दिव्य करुन संवाद  सभेचे रुपांतर विराट जाहीर सभेत करुन तुळजापूर तालुक्यात भाजपा की ताकद दाखविण्याचे आवाहन भाजपा जिल्हाअध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केले .
तुळजापूर येथील पुजारी मंडळ मंगल कार्यालयात  शुक्रवार दि 23 रोजी महाजनादेश याञेच्या पुर्वतयारी संर्दभात घेण्यात आलेल्या भाजपा तालुका कार्यकत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सदस्य नितीन काळे,  मिडीया विभागाचे जिल्हाअध्यक्ष धनंजय रणदिवे, एड. अनिल काळे, , देवानंद रोचकरी  विजय शिंगाडे,  गोकुळ शिंदे , क्रांती थिटे, मिनाताई सोमाजी, संगिताताई कदम, सुहास सांळुके, नागेश नाईक, विकास मलबा, , सुहास साळुंके, विशाल रोचकरी, संदीप गंगणे, सचिन ताकमोघे आदीं प्रमुख पदाधिकारी सह कार्यकते, तालुक्यातील सर्व शाखेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top