तेर/प्रतिनीधी- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील दलित वस्तीतील 2014 ते 2019 या कालावधीतील कामाची चौकशी करण्याची मागणी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी कांबळे यानी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तेर येथील मागील चार वर्षात झालेल्या दलित वस्तीतील कामाची चौकशी करण्यात यावी,संबधित दोषी ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून दोषी ठेकेदाराचे लायसन ब्लँकलिष्टमध्ये टाकावे, जिल्हा परीषद अभियंते यानी निक्रष्ट कामाला चांगले किंवा उक्रष्ट करण्याचे काम वारंवार केले त्याची चौकशी करून दोषी अधिका-यावर कायदेशीर कार्यवाही करावी.ज्या- ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या सर्व कामाचे पैसे हे सर्व दोषी कडून वसूल करून ते काम योग्य पद्धतीने पुन्हा लवकरात लवकर पूर्ण करावे.याबाबत लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा लहूजी शक्ती सेना जिल्हाभरात तीव्र अंदोलन उभा करेल असे लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी कांबळे यानी निवेदनात ऩमूद केले आहे.निवेदनाच्या प्रति तहसिलदार,गट विकास अधिकारी,ग्रामपंचायत,तेर यांनाही देण्यात आल्या आहेत.