तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील एल.एम.एस.पी.सोसायटीच्या चेअरमनपदी रीयाज कबीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तेर एल.एस.एम.पी.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक 30 मार्च 2015 रोजी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 12 संचालक निवडून आले .चेअरमनपदी नवनाथ नाईकवाडी यांची निवड करण्यात आली.नुकत्याच पार पडलेल्या तेरच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत नवनाथ नाईकवाडी निवडून आल्याने त्यानी चेअरमन पदाचा राजीनामा दिला.रीक्त झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणूकीसाठी 23 आँगष्टला संचालक मंडळाची बैठक होऊन रीयाज कबीर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.निवडणूक अधिकारी म्हणून बालाजी सावकर यानी काम पाहीले तर त्यांना गटसचिव बी.डी.कांबळे यानी सहकार्य केले.    निवडीनंतर रीयाज कबीर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवाजीराव नाईकवाडी,सरपंच नवनाथ नाईकवाडी,उपसरपंच बाळासाहेब कदम,विठ्ठल लामतुरे,भास्कर माळी,जुनेद मोमीन,मंगेश पांगरकर,राजेंद्र कानडे,अनंत साखरे उपस्थीत होते.
 
Top