लोहारा/प्रतिनिधी-
नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत राष्ट्र निर्माण - राष्ट्रभक्ती या विषयावर तालुकास्तरीय भाषण स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी सर होते.  तर प्रमुख पाहुणे म्हणून  प्रा. यशवमत चंदनशिवे, प्रा. अमर कीर्तने, नेहरु युवा केंद्र तालुका समन्वयक किशोर होनाजे आदींची उपस्थिती होती. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.छाया कडेकर, प्रा.डॉ. एस. एम. गायकवाड, प्रा. संजय मोटे यांनी काम पाहिले. या तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम कु.सोनाली जावळे व द्वितीय स्वामी आकाश तर तृतीय कू. निखिता बादुले यांनी मिळवुन यश संपादित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रा.कटकधोंड सर यांनी मानले. स्पर्धा यशस्वि करण्यासाठी नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक किशोर होनाजे,  निकिता गायकवाड  अदिंनी परिश्रम घेतले.
 
Top