उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील मुळज येथे ग्रामदैवत श्री. जटाशंकर हेमाडपंती मंदिरात श्रावण महिन्याचे औचित्य साधून शुक्रवार, दि. 2& रोजी सकाळी बिल्वार्चन सोहळा महाआरतीने मोठा उत्साहात संपन्न झाला.
तालुक्यातील मुळज येथे हेमाडपंती जटाशंकर मंदिर असून वर्षभरात विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तर शुक्रवारी सकाळी श्रावण महिन्यानिमित्त हभप कमलाकर मुळे महाराज यां‘या मार्गदर्शना खाली महंत वामनगिरी महाराज यां‘या हस्ते भव्य बिल्वार्चन सोहळ्याला सुरवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अभय चालुक्य यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसहस्र नामावलीचा जप व जयघोषात शेकडो भाविकांनी स्वयंभू जटाशंकर शिव लिंगाला एक लाख बेलाची पाने अर्पण केली. महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळ्याचे पौराहित्य आशोक जोशी, केतन जोशी यांनी केले. या धार्मिक सोहळयात दिगंबर बिराजदार, देवस्थान समीतीचे रघुनाथ बिराजदार, पद्माकर बेळंबे, रघुनाथ मुळजे, देवीदास चव्हाण, माधव औरादे आदीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलाची संख्या लक्षणीय होती.

 
Top