
परंडा/प्रतिनिधी-
विद्याथ्र्यांनी आपल्या जिवनात यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम करावे आपले स्वत: हाचे व आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करण्यासाठी जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करावे शिक्षण घेत असताना आपल्या हातून चूक होऊ देऊ नये कारण आपली एक चूक आयुष्याचे नुकसान करते असे मत परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सय्यद इक्बाल यांनी शिक्षणमहर्षी गुरूवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या अॅन्टी रँगींग मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थाना मार्गदर्शन करताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या.डॉ.दिपा सावळे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर अॅन्टी रँगींग समितीचे समन्वयक व संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.एस.के.गायकवाड उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.बी.वाय माने, प्रा.डॉ अरुण खर्डे, प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड, प्रा.संतोष काळे, डॉ रंदील.जी.एस, डॉ.सचिन चव्हान, डॉ.प्रकाश सरवदे यांनी सहकार्य केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.विपा सावळे यांनी म्हटले की विद्याथ्र्यांनी आपले ध्येय याच वयात ठरवायची असतात.आपल्या आई वडिलांचे स्वप्न धुळिस जाणार नाहित यासाठी मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत तुमच्या उज्वल भवितव्यासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे जिद्द आणि चिकाटी मनात ठेवली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड यांनी मानले.