उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 येथील नगरसेविका प्रेमाताई पाटील यांच्या माध्यमातून एक हजार महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठविल्या.शहरातील एक हजार महिलांनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठवल्या आहेत. सोबतच एका पत्राद्वारे महिलांनी आपल्या विविध समस्याही मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांच्या प्रेरणेतून जिल्हाभरातून विविध महिला मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवत आहेत. यशस्वितेसाठी स्वप्नील पाटील, के. पी. पाटील यांनी पुढाकार घेतला.
नगरसेविका प्रेमाताई पाटील यांच्या माध्यमातून महिलांनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवल्या. 
 
Top