भुम /प्रतिनिधी-
शहरातील  सर्व समाजातील युवक बांधव आणि रोटरी क्लब भुम  यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवुन कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नागरिकांनी आणुन दिलेली मदत माजी मुंख्यमंञी के वसंतदादा पाटील यांच्या गावासह इतर गावांना स्वत: पोच करून दुवा घेण्याचे कार्य भूम च्या युवकांनी केले.
नागरिकांनी आणुन दिलेले बिस्कीट ,फरसाण ,पाण्याची बाटली, भाकरी ,चपाती लोणचे , कापडे ,साड्या लहान मुंलाचे कपडे, स्वेटर, ज्वारी ,पिट ,तांदुळ ,दाळ ,तेल आदी सामान टोम्पो भरून भुम मधुन दि 10 रोजी शनिवारी राञी पुरग्रस्त सांगलीकडे जाऊन दि. 11 च्या  सकाळी तासगांव येथे पोहचुन तेथील वुत्तपञ एजंट अजित माने  यांच्याकडून परिस्थिती विचारुन त्यांचे मिञ शशीकांत पाटील अजित पाटील यांना सोबत घेऊन पद्माले, कर्नाळ,बिसुर, नाद्रे, काठव, ब्राह्मणल, चोपडीवाडी, खंडोचिवाडी, भिलवडी स्थानक, जुळेवाडी, आदी ठिकाणी पाण्याच्या प्रवाहातून जाऊन बिस्किटे फरसाण, लोणचे भाकर, ठेचा भाकर व गरम राईस तयार करून खाऊ घातले व अंगावरील कपडे, शाल संतरंज्या पाणी बॉटल आदी साहित्य वाटप केले.
 भिलवंडी येथे माजी मंञी कै.पतंगराव कदम यांच्या पत्नी श्रीमती विजयाताई कदम यांच्या हस्ते मदत वाटप करण्यात आली. यावेळी उस्मानाबाद भुम करांचे मदत कधी हि विसरणार नसल्याचे त्यांनी सांगीतले  या प्रसंगी भुमचे धाडस प्रतिष्ठनचे अनिल शेंडगे, रोटरीचे संतोष वरळे, अरविदं शिंदे, अनिल शेळके, संतोष सांळुके, विठ्ठल बाराते, महेश गुळमे, अतुल डिसले , श्रीकांत केदारी, ललु गरड, आण्णा कांबळे,  अजित बागडे, विकास ,हे या मदत कार्यात सहभाग होते

 
Top